दिवाणी न्यायालये व प्रकरणे
एखाद्या जमिनीचा वाद असल्यास बरेचदा असा गोंधळ उडतो
की दावा कुठे दाखल करावा. काही लोकं महसूल न्यायालयात जातात तर काही लोकं दिवाणी
न्यायालयात जातात. पण तसे करण्याची गरज नाही. कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की एखादी
नोंदणीकृत दस्त जसे की, खरेदीखत, बक्षीस पत्र, हक्कसोड पत्र, मृत्यूपत्र किंवा साठेखत
किंवा आजून कुठले दस्त जे नोंदणीकृत असेल यास आव्हानीत करायचे झाल्यास त्याला फक्त
आणि फक्त दिवाणी कोर्टात केले जाऊ शकते. याच बरोबर जर जमिनीचे वाट्प करुन हवे
असल्यास ते सुध्दा इथेच केले जाऊ शकते.
नोंदणीकृत दस्त :
समजा तुमच्या हक्काची जमीन आहे व त्या जमिनीचे
एखाद्या नोंदणीकृत दस्ताने हस्तांतरण झाले असेल. ते करताना तुमची सही घेतली नसेल.
संमती घेतली नसेल. किंवा मोबदला दिला नसेल. किंवा आजून कुठल्या पध्दतीने
बेकायदेशीर मार्गाने तुमचा हक्क डावलून असे दस्त करण्यात आले असल्यास तुम्ही दस्त
नोंद झाले त्या दिवसा पासून ३ वर्षाच्या आत किंवा तुम्हाल असे दस्त झाल्याचे कळले
त्या दिवसा पासून ३ वर्षाच्या आता दिवाणी कोर्टात हे दस्त रद्द करुन घेणे कामी दाव
दाखल करायचा असतो. तसे न केल्यास दावा दाखल करण्याची लिमिट संपते व मुदतीची बाधा
येते. एकदा मुदतीची बाधा आली की मात्र विलंब माफीचा अर्ज दाखल करावा लागतो. आधी
त्यावर सुनावणी होते. तो मंजूर झाल तरच मग पुढे मुख्य दावा चालतो. अन्यथा दावा
तिथेच रद्द होतो.
सरस निरस वाटपाचा दावा:
समजा तुमची वडिलोपर्जीत मिळकत आहे. आणि त्यात
आजून वाट्प झाले नसेल अशा वेळी तुम्ही आपल्या भावंडाना एक नोटीस धाडून वाट्प मागू
शकता. पण त्यांनी वाटपास नकार दिल्यास तुम्ही दिवाणी कोर्टात सरस निरस वाटपाचा
दावा दाखल करुन आपला हिस्स स्वतंत्र करुन घेऊ शकता. त्यास तुम्हाला मुदतीचे बाधा
येत नाही. फक्त एकट अट आहे. तुमच्या जेवढ्या काही वडिलोपर्जीत मिळकती आहेत त्या
सर्व एकत्रपणे दाव्यात घ्याव्या लागतात. एक जरी मिळकत सुटली की दावा रद्द होतो.
तसेच दाव्यात आवश्यक असलेले पक्षकार समाविष्ठ करणे जरुरी असते. एखाद्या पक्षकारास
दाव्यातून वगळल्यास दावा रद्द होऊ शकतो.
इथे हायरार्की कशी असते.
दिवाणी कोर्टाची हायरार्की येणे प्रमाणे असते.
दिवाणी कोर्ट, कनिष्ठ वर्ग:
या कोर्टात रु. ५,००,०००/- किंवा त्यापेक्षा
कमी दावा मुल्य असलेले दावे चालविले जातात. दावा मुल्य म्हणजे काय? जर तुम्ही एखादे दस्त
रद्द करुन मागत असाल. आणि त्या दस्तात मिळकतीची किंमत रु. ४,५०,०००/- असेल तर ही किंमत
दाव्याचे मुल्य म्हणून धरले जाते. त्याच बरोबर तुमच्या जमिनीत जर एखाद्याने काही
नुकसान केले, नासधुस केली तर
झालेल्या नुकसानीची भरपाई १,५०,०००/- असेल. तर
आता मात्र दावा मुल्य रु. ४,५०,०००/- आणि रु. १,५०,०००/- असे एकुण रु. ६,००,०००/- इतके दावा मुल्य
होते. अशा वेळी ही केस कनिष्ठ कोर्टात चालविली जाऊ शकत नाही.
दिवाणी कोर्ट, वरिष्ठ स्तर:
या कोर्टात दावा मुल्य रु. ५,००,०००/- पेक्षा अधिक असलेले
सर्व दावे चालविले जातात. त्यामुळे एखादे मोठया किंमतीचे दस्त रद्द करायचे असेल.
किंवा नुकसान भरपाईची रक्कम जोडल्यावर दावा मुल्य रु. ५,००,०००/- पेक्षा अधिक होत
असेल. तर अशा सर्व केसेस दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर यांचे कोर्टात चालविले जातात.
No comments:
Post a Comment