फ्लॅट धारकांवर कारवाई
सहकार कायद्या नुसार सर्व फ्लॅट धारक हे ताबेदार असून सोसायटी ही मालक असते. त्यामूळे एखादा सभासद नियमाचे उल्लंघन करत असेल किंवा ऐकत नसेल व नुकसान करत असेल किंवा बेशिस्त पणाने वागत असेल तर त्यावर उपविधी क्रं. ४८ प्रमाणे कारवाई करता येते. त्याला फाईन मारता येते. काही काळासाठी त्याचे सभासदत्व रद्द करता येते. त्याला फ्लॅट मध्ये येण्यास काही कालावधीसाठी बंदी घालता येते. अशा प्रकारच्या शिक्षा देण्याचा अधिकार सोसायटीला आहे. हे सर्व करुनही जर तो सभासद सतात नियमाचे उल्लंघन करीत असल्यास मात्र उपविधी क्र्. ४९ च्या तरतुदी नुसार त्याचे सभासदत्व रद्द करता येते. ही कारवाई सहजासहजी करता येत नाही. अगदीच सर्व पर्याय संपल्यावर असा टोकाचा निर्णय घेता येतो. एकुण काय तर कारवाई करण्याचे मार्ग मोकळे आहेत. सोसयटीने ठरविल्यास त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
कार पार्किंगचे वाट्प
सोसायटी म्हटले की सर्वाज जास्त राडा असतो तो कार पार्किंगचा. लोकं फ्लॅट घेताना पार्किंग विकत घेत नाहीत अन मग मधेच कुठेतरी मोकळी जागा दिसली की कार पार्क करुन एकमेकांशी भांडणं लावुन बसतात. बरेचदा बिल्डर सुध्दा पैसे घेऊन पार्किंग देत नाही. मग सभासदांमध्ये भांडणे सुरु होतात. यावर कायदेशीर उपाय काय? तर आपल्या उपविधी क्रं. ७८ ते ८२ पर्यंतच्या ज्या तरतुदी आहेत त्या कार पार्किंगच्या संदर्भाने आहेत. थोडक्यात सार काय आहे? या सर्व तरतुदींचा थोडक्यात सार असा आहे की बिल्डरला कार पार्किंग विकण्यचा अधिकार नाही. त्यामुळे सर्व पार्किंग ही सोसायटीच्या मालकीची असते. ती कोणाला द्यावी याचा निर्णय सोसायटीने घ्यायचा असतो. बिल्डरनी दिलेली कार पार्किंग पैसे मोजून घेतली असली तरी सोसायटी अशा सर्व पार्किंच रद्द करु शकते व आपल्या हिशेबाने व कमिटिच्या निर्णया नुसार पार्कींगचे वितरण करु शकते. त्यामुळे कार पार्किंग हा बिल्डरच्या अधिकारातील विषय नसून तो १००% सोसायटीचा अधिकार आहे.
पाणि कपात व शिक्षा
सोसायटीत जेंव्हा एखादा थकबाकीदार पैसे देत नसेल तर त्याचे पाणी कपात करता येते का? असा प्रश्न नेहमी विचारला जात असतो. यावर उत्तर आहे.... होय. थकबाकीदार सभासदाचे पाणि कपात केले जाऊ शकते. एखादा सभासद मेंटेनन्स देत नसेल. त्याच्या विरुध्द वसुली दाखला प्राप्त झाला असेल्. डिमांड नोटीस पाठवून झाली असेल. तरी जर तो पैसे देत नसेल तर मग त्याचे पाणी कपात करता येते. बर या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो आहे. जजमेंटचे नाव आहे. विलास गोपाल डोंगरे वि. म.न.पा. कल्याण डोंबिवली (रि.पि.नं. ४११६/२०२२) या जजमेंट मध्ये मे. कोर्टाने असे म्हटले की इथे मानवी हक्काचे उल्लंघन हा विषय येत नसून सभासदाने पैसे न भरल्यास पाणी कपात केली जाऊ शकते.
कन्वेयन्स डीड
सोसायटी म्हटलं की जिव्हाळयाचा व महत्वाचा विषय असतो तो म्हणजे कन्व्हेयन्स डीड. काय असते हे. याला दस्त मालकी हक्काचे हस्तांतरण करणारे दस्त असे म्हणतात. जेंव्हा बिल्डर तुमची इमारत उभी करतो तेंव्हा ती जमीन ज्याच्या नावे असते तो एकतर शेतकरी असतो किंवा जागा विकत घेतली असल्यास बिल्डर हा जागेचा मालक असतो. म्हणजेच जागेची मालकी शेतकरी किंवा बिल्डर यांची असते. त्यावर बांधलेली इमारत मात्र तुम्हाला विकली जाते. इमारतीमध्ये तुमची जी काही मालकी असते त्याचे स्वरुप मालकी हक्काचे नसून ताबेदार अशा प्रकारचे असते. म्हणजेच तुम्ही जरी फ्लॅट विकत घेतला तरी तुम्ही कायद्या प्रमाणे मालक नसून ताबेदार असतात. आणि ज्याच्या नावे जागा आहे तो ७/१२ सदरी असतो. त्यामुळे तो मात्र मालक असतो. आता तुम्ही ७/१२ वरुन बिल्डरचे नाव हटवून तुमच्या सोसायटीचे नावे घालणे जरुरी असते. ते घालण्यासाठी जो कागद लागतो त्या कागदाला किंवा दस्ताला कन्व्हेयन्स डीड असे म्हणतात. हा दस्त म्हणजे बिल्डर कडून जमिनीचे मालकी हक्क सोसायटीला हस्तांतरीत करण्याचा दस्त आहे. जोवर हा दस्त होत नाही तोवर तुम्ही मालक बनत नाही. त्यामुळे फक्त फ्लॅट घेउन भागत नाही. तर तुम्ही हा दस्त करुन मालकी सुध्दा घ्यायची असते. एका वाक्यात.. मालकी हक्क देणारा दस्त म्हणजेच कन्व्हेयन्स डीड होय.
Deemed Conveyance:
कन्व्हेयन्स डीड दोन प्रकारे केला जातो. एक तर
बिल्डरनी स्वेच्छेनी नियमा प्रमाणे तुम्हाला तो दस्त करुन दयायचा असतो. त्यावर तसे
कायदेशीर बंधन आहे. परंतू जर त्यांनी तसे न केल्यास त्याला एक कायदेशीर नोटीस
बजावून दस्त करुन देण्यास सांगितले जाते. त्यावर जर त्यानी सकारात्मकता दाखवून
दस्त केल्यास उत्तमच. पण न केल्यास तुम्ही नोटीसची कॉपी व इतर कागदपत्र घेऊन जिला
उपनिबंधक सोसायटी यांचे कडे अर्ज देऊ शकता. त्याची सुनावाणी करण्य़ासाठी बिल्डरला
समन्स व नोटीस बजावणी होते. बिल्डर न आल्यास एकतर्फी आदेश होऊन बिल्डरच्या
अनुपस्थितीत तुमच्या नावे कन्व्हेयन्स डीड करुन देण्याचे आदेश होतात. या आदेशाची
कॉपी घेऊन तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊ शकता व कन्व्हेयन्स डीड करुन घेऊ
शकता. याला डिम्ड कन्व्हेयन्स असे म्हणतात.
No comments:
Post a Comment