Showing posts with label फौजदारी केसेस. Show all posts
Showing posts with label फौजदारी केसेस. Show all posts

Wednesday, 18 November 2020

हुंडाबळी मृत्यू 304(बी)

हुंडाबळी मृत्यू तेव्हाच मानल्या जातं जेव्हा विवाहितेचा मृत्यू लग्ना पासून 7 वर्षाच्या आता झाला असेल तर. पण त्यासाठी काही अटी आहेत त्या म्हणजे हा मृत्यू नैसर्गिक व सामान्य परिस्थितीसी विसंगत म्हणजेच न जुळणारा असावा. म्हणजेच नैसर्गीक मृत्यू झाल्यास या कलमांतर्गत केस बूक होणार नाही.

मग कोणत्या परिस्थितीत मृत्यूला हुंडाबळीचा मृत्यू मानला जाईल? सारच्यांकडून छळ, जाळुन मारणे, आत्महत्या किंवा आजून कोणतिही पध्दत जी शंकास्पद असेल न नैसर्गीक वाटत नसेल तर मग अशा मृत्यूला हुंडाबळी मृत्यू मानला जाईल.

केस: हेमचंद्र वि. हरियाणा सरकार ( 1995, SC,120 AIR) 

हिमाचल प्रदेश सरकार वि. निक्कुराम (AIR 1995, SC 67) या केसमध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने मिळालेले पुरावे हुंडाबळीचा मृत्यू हे सिध्द करण्यास पुरेसे नाहीत म्हणून आरोपीस दोषमुक्त केले.

त्यामुळे केसचा बारकाईने अभ्यास करूनच युक्तीवाद करावा.

माफी मागून मोकळं व्हा.

Probation offenders act sec 4 & 12 च्या अंतर्गत 323 च्या केसेसचा गुन्हा कबुल करून मोकळं होता येतं. होतं काय की बरेचदा आपण चुकून किंवा संयम सुटला म्हणून मारापिटी करतो व आपल्यावर फौजदारी कारवाई होते. मग आपण घाबरून जातो ल नुसती पळपळ करतो. पण तसं करायची अजिबात गरज नसते. तुम्ही जर गुन्हेगारी वृत्तीचे नसाल व पहिल्यांदाच असं काही घडलं असेल तर मार्ग आहे तो म्हणजे प्रोबेशन ऑफेंडर्स एँक्ट.

सेक्शन 4: या सेक्शमध्ये गुन्हेगाराला त्याच्या चांगल्या वर्तनामुळे शिक्षा माफ करण्याची तरतूद आहे. चुकून भांडण झालं असल्यास जज समोर गुन्हा कबूल करून या सेक्शन अंतर्गत माफी मागावी. जज तुम्हाल प्रोबेशनवर सोडून देतील.

सेक्शन 12:- मध्ये काही संपत्ती वगैरे अटँच केली असल्यास ती मोकळी केली जाते.

थोडक्यात जर तुम्ही Frequent Offender नसाल व चिरकुट गुन्हा घडला असल्यास वरील कायद्यातील सेक्शन 4 व 12 तुमची मदत करतो. मा. जज समोर गुन्हा कबुल करायचा व माफी मागून मोकळं व्हायचं. बाकिची भानगड करत बसायचं नाही.