क्षेत्राची मोजमाप
आता अजून एक महत्वाचा विषय म्हणजे जेंव्हा शेत
जमीन म्हणतो तेंव्हा महत्वाचा विषय येतो तो म्हणजे याचे क्षेत्र कसे मोजतात? लोकांच्या तोंडात बसलेला
शब्द म्हणजे अमूक इतकी एकर शेतजमीन आणि तेवढे गुंठे शेतजमीन असं आपण ऐकतो. पण जर
तुम्ही ७/१२ काढुन पाहिल्यास एकर व गुंठा हा प्रकारच दिसत नाही. मग लोकं हे शब्द
कुठून आणलेत असा प्रश्न पडतो. हे खूप जुने एकक असून ते आता वापरात नाही. आज घडिला
७/१२ वरील क्षेत्र मोजमाप करण्याचे दोनच एकक आहेत. आर आणि हेक्टर. याचं गणित सोपं
आहे. १० मिटरची पट्टी घ्यायची. आणि या पट्टीने उभे १० मिटर आणि आडवे १० मिटर
मोजल्यावर जो चौकोन तयार होतो त्याला १ आर असे म्हणतात. त्याचे क्षेत्र किती होते? १० गुणिले १० केल्यास १००
चौरस मिटर एवढे क्षेत्र होते. या १०० चौ. मि. क्षेत्राला १ आर असे म्हणतात. आणि
असे १०० आर एकत्र जोडले की त्याला १ हेक्टर असे म्हणतात. इतकं सोपं आहे. पण लोकं
मात्र उगीच एकर व गुंठा म्हणून घोळ घालतात व अस्तित्वात नसलेले एकक वापरुन उगीच
गोंधळुन जातात. मुळात एकर व गुंठा हे एकक अस्तित्वातच नाहीत. आर आण हेक्टर हेच
जमीन मोजण्याचे एकक आहेत. ते वरील प्रमाणे असुन एकदा ते नीट समजले की क्षेत्र
समजून घेताना कोणतीच अडचण होत नाही.
मग प्रश्न पडतो की गुंठा काय प्रकार आहे?
त्याचा पण एक मजेदार इतिहास आहे. ब्रिटिशाना
भारताची अख्खी जमीन मोजून काढायची होते. त्यासाठी एका अधिका-याची नेमणूक करण्य़ात
आली. त्याचे नाव होते Edmund Gunter. हा माणूस जमीन मोजून
काढण्यात उस्ताद होता. मग तो आपला सगळा लवाजमा घेऊन भारतात आला. ३३ फुटाची साखळी
घेतली आणि उभा देश मोजून काढला. त्या ३३ फुटाच्या साखळीने एक साखळी उभी व एक साखळी
आडवी असे मोजल्यावर जो चौकोन तयार होतो तो १०८९ चौरच फुटाचा होता. हा चौकोन म्हणजे
एक गुंठा होय. आता याला गुंठा का म्हणतात? कारण साखळीवाला बाबा Gunter होता ना... मग
गुंटरनी मोजलेला भुखंड म्हणजे गुंठा. अशा पध्दतीने गुंठा हा शब्द अस्तित्वात आला.
आणि मग असे ४० गुंठे एकत्र केले की एक एकर क्षेत्र धरले जायचे. पण नंतर ब्रिटीश
गेले आणि गुंटरचा गुंठा पण गेला. पण आपल्या तोंडून मात्र आजूनही गुंठा काही जात
नाही. तर असा आहे गुंठ्याचा इतिहास.
No comments:
Post a Comment