Showing posts with label विवाहितेचा छळ-४९८अ. Show all posts
Showing posts with label विवाहितेचा छळ-४९८अ. Show all posts

Wednesday, 24 April 2019

फरक- ४९८-अ आणि घरगुती हिंसाचार कायदा


मी नेहमी म्हणत आलोय की मागच्या काही वर्षात आपल्याकडे दोन प्रकारच्या केसेसमध्ये अचानक वाढ झालेली दिसते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे चेक बाऊन्स व दुसरा म्हणजे फॅमिली मॅटर्स. कायदा हा नेहमीच कमकुवताला संरक्षण देण्याच्या उद्देशाने काम करत असतो. त्या तर्कावर स्त्री वलहान मुलं ही समाजातील दुर्बल घटक असून त्यांच्या संरक्षणार्थ अनेक कायदे करण्यात आलेले आहेत. अशातिल एक सर्व श्रूत कायदा म्हणजे Protection of Women From Domestic Violence Act-2005. हा कायदा स्त्रीयांना घरगुती हिंसाचारा पासून संरक्षण देण्याठी बनविण्यात आलेला आहे. या कायद्याचा उद्देश स्त्रीला सन्मानाने जगता यावी, तिची कुटूंबाकडून छळवणूक होवू नये. त्याच बरोबर जेंव्हा नाती बिनसतात तेंव्हा आर्थीक हालाखीचा सामना करावा लागू नये म्हणून तीला कुटूंबाच्या संपत्तीत हक्काने दावा सांगून स्वत:चा उदरभरण करण्यासाठी लगेच मेंटेनेन्स मागण्याची वा मिळविण्याची सोय या कायद्यात केलेली आहे.

या कायद्या बद्दल लोकांमध्ये Fundamental Confusion आहे. खूप सारे लोक अस मानतात की हा कायदा नवरा बायकोच्या वादात बायकोला संरक्षण देण्यासाठी आहे. परंतू ते वास्तव नाहीये. हा कायदा समस्त स्त्री वर्गासाठी असून याच्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी नवरा बायको हे नाते असावे अशी अजिबात अट नाही. या कायद्यात एकूण ३७ सेक्शन असून सेक्शन २(अ) मध्ये व्यथीत स्त्री बद्दल सखोल लिहलेले आहे.

Section 2(a) :  “Aggrieved Person” means any woman who is, or has been, in a domestic relationship with the respondent and who alleges to have been subjected to any act of domestic violence by the respondent.

तर वरील सेक्शन स्पष्टपणे म्हणतोय की पिडित स्त्री म्हणजे कोणतीही स्त्री जी एखाद्या व्यक्ती सोबत एकाच निवा-याखाली राहते. मग तिच्यावर अन्याय करणार फक्त नवराच नाही, तर बाप, भाऊ, चुलता किंवा आजून कोणी असो. एकत्र राहात असताना  कुटूंबाती इतर सदस्यांकडून स्त्रीवर हिंसाचार होत असल्यास तो हिंसाचार या कायद्या अंतर्गत येतो व कारवाईस पात्र ठरतं. सासर असो किंवा माहेर असो किंवा काका, मामा, आत्या, बहिण भाऊजी असे कोणतेही नाते असो. त्या कुटुंबात तुम्ही कुटुंबाचे सदस्य म्हणूर राहात असाल व तिथे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाला असल्यास वा होत असल्यास तो हिंसाचार या कायद्या अंतर्गत येतो व आरोपींवर कारवाई होते.
मग खूप लोकांना प्रश्न पडतो की तो ४९८(अ) काय आहे? हा ४९८(अ) स्त्री साठीचा सेक्शन नसून तो स्पेसिफीकली विवाहीत स्त्री ला संरक्षण देणारा कलम आहे. स्त्री व विवाहीत स्त्री यातला फरक असा आहे की स्त्री म्हणजे कोणतेही. सासुरवासीन, माहेरवासी, आई, बहिण, मुलगी, भाची, पुतनी वगैर वगैर. यात आरोपी हे आई, बाबा, काका, मामा, ते नवरा व सासू सासरे असे कोणीही असू शकतात. पण ४९८(अ) सेक्शन हा तसा नाही आहे. हा फक्त नि फक्त विवाहीत स्त्रीच्य संरक्षणार्थ असून यात आरोपी हे फक्त सासरकडेच असू शकतात. म्हणजे नवरा, सासू, सासरे, नणंद वगैरे. तो सेक्शन खालीलप्रमाणे आहे.

Section-498(a) of IPC: Husband or relative of husband of a woman subjecting her to cruelty- whoever, being the husband or the relative of the husband of a woman, subjects such woman to cruelty shall be punished with imprisonment for a term which may extend  to three years and shall also  be liable to fine.

वरील कायदा व सेक्शन ४९८(अ) यात एक प्रोसेजरल फरक आहे तो असा. जेंव्हा एखाद्या स्त्रीचा सासरी छळ होतो तेंव्हा ती थेट पोलिस स्टेशन गाठून सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार देऊ शकते. ही तक्रार ४९८(अ) अंतर्गत नोंदविली जाते व तपास केल्या जातो. त्या नंगर एफ. आय. आर. बनविली जाते व कोर्टात पोलिसांद्वारे केस दाखल केली जाते. पुढे सखोल तपास केल्या जातो व ९० दिवसात सखोल तपासाची रोपोर्ट(चार्ज शीट) न्यायालयात दाखल केली जाते. त्या नंतर केसची ट्रायल सुरु होते.

पण याच्या उलट Protection of women from domestic violence Act-2005 मध्ये सेक्शन १२ च्या अंतर्गत थेट मॅजिस्ट्रेटकडे अर्ज दाखल केल्या जातो. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा अर्ज दाखल केल्यावर कोर्ट अगल्यावाल्या पार्टीला नोटीस धाडते. त्या नंगर अलगीवाली पार्टीला कोर्टातद्वारे त्यांच्यावर जी तक्रार दाखल केलेली आहे त्याची कॉपी दिली जाते. या नंतर आरोपी पक्षाला उपरोक्त तक्रारी बद्दल आपले लिखीत उत्तर सादर करावयाचे असते. त्या नंतर केसची ट्रायल चालते. परंतू या दरम्यात एक महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे केस चालू असतांना स्त्री च्या मेंन्टेनेन्सचा प्रश्न उभा होतो. त्यामुळे लगेच दुस-या तारखेला स्त्री मेन्टेनेसचा अर्ज टाकते. न्यायालय आधीचा तक्रारीचा अर्ज तसाच ठेवते व आधी मेन्टेनेसच्या अर्जावर सुनावनी करते. अन या सुनावणीत (जर स्त्री स्वत: कमावती नसल्यास) १००% निकाल स्त्रीच्या बाजूनी लागतो व तिला तात्काळ मेन्टेनेन्स सुरु होतो.
आता इथून पुढे मग केसची ट्रायल सुरु होते.

टीप: हा मेन्टेनेन्स कसा चुकवायचा याची कुठेच उपाययोजना नाही, परंतू तो कमीत कमी कसा द्यावा लागेल यासाठी काही उपाय आहेत. ते बरोबर फॉलो केल्यास त्या आधारे एक तडाखेबंद आर्ग्यूमेंट करुन जजला किमान मेंन्टेनेन्सची ओर्डर काढायला भाग पाडत येते. त्या बद्दल पुढच्या लेखात लिहतो.   

Wednesday, 17 April 2019

D.V. Case व Interim Relief.


डी.व्ही. म्हणजे (Domestic Violence) च्या बाबतीत कायदे एकदम कडक आहेत. लोकांमध्ये फॅमिली मॅटर व डी.व्ही. मॅटर याच्याबद्दल थोडासा गोंधळ आहे. खरतर फॅमिली कोर्ट हे स्वतंत्र कोर्ट असतात व त्यात घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा या केसेसचा निवाडा होतो. डी.व्ही. मात्र स्वतंत्र विषय आहे. जरी मामला कुटूंबातला असला तरी यात विवाहीतेवर कौटुंबिक अत्याचार झाल्यास त्याचा निवाडा डी.व्ही. कोर्टा अंतर्गत होते. आजकाल डि.व्ही. चे स्वतंत्र कोर्ट असतात. स्त्रीला कोणत्याही प्रकारचा फिजीकल,  मेंटला व आजुन कोणत्याही प्रकारे सासरच्यांकडून त्रास दिल्या गेल्यास याची थेट केस डी.व्ही. कोर्टात दाखल केल्या जाते व लगेच आरोपींना नोटीस पाठवून केस लढविली जाते. यात अजून एक महत्वाची बाब अशी आहे की जर का नवरा बायकोत विसंवाद झाला व बायकोनी थेट माहेरचा रस्ता धरला. अन अस समजा की मुलगा मुंबईचा आहे व मुलगी पुण्याची. तिच्यावर अत्याचार मुंबईत झाला असला व कायदा म्हणतो की घटना ज्या ठिकाणी घडली त्याच्या हद्दीतील पोलिस स्टेशनात तक्रार दयायला हवे. तरी मात्र डी.व्ही.चा मामला असल्यास स्त्री आपल्या माहेरी येऊन म्हणजेच पुण्यात येऊन इथे तक्रार दाखल करु शकते व तिची केसही पुण्यातच चालविली जाते. थोडक्यात डि.व्ही. अक्ट स्त्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतो.



यात अजून एक एडिशनल बाब अशी आहे की पिढीत स्त्रीने कौटुंबिक अत्याचाराच्या आधारे केस दाखल केली की लगेच पाठोपाठ त्याच केसमधे Interim Relief चा अर्ज देऊन मासिक मेंटेनेन्स मागू शकते. महत्वाचं म्हणजे हा मेंटेनेन्सचा अर्ज लगेच ग्रांट पण होतो व तडकाफडकी नव-याच्या विरोधात ओर्डर होते. अमूक एक रक्कम केसचा निकाल लागेस्तोवर नव-यांनी बायकोला द्यावा अशी ओर्डर लगेच नव-याच्या हाती दिली जाते. मग नवरोबा लोकं पुढच्या दोन तीन तारखा पैसे देण्याचे टाळतात. पण कोर्ट मात्र या मामल्यात ठाम असते व तिन चार तारखा चुकल्या की लगेच NBW (Non Bailable Warrant) काढून थेट नवरोबांना अरेस्ट करुन कोर्टात आणले जाते.
थोडक्यात डी.व्ही. केस ही नुसती कौटुंबीक हिंसाचार एवढ्यावरच थांबत नाही तरी केस चालू असतानाच्या काळात स्त्रीला त्रास होऊ नये म्हणून लगेच मेंटेनेन्स पण ग्रांट करुन त्याची अमलबजावनी होत आहे याची खात्री करुन घेते.

Sunday, 14 April 2019

विवाहितेचा छळ-४९८अ

विवाहीत स्त्रीला कायद्याने अनेक तरतुदींतून जास्तीत जास्त सुरक्षीतता दिली आहे. तरी ती कमी पडायची व सासरचे लोक सुनेवर अत्याचार करुन अलगद निसटायचे. मग हे प्रकार प्रचंड प्रमाणात होताना दिसल्यावर विवाहितेला वाढीव कवच देण्याचा निर्णय झाला. तो कवच दिल्या गेला आय.पी.सी. च्या कलम ४९८-अ मधुन. हे कलम विवाहितेला सासरी वावरताना आत्मविश्वासाने जगण्याची मुभा देतो. लग्न झाल्या पासून सात वर्षाच्या आत विवाहितेचा मृत्यू झाल्यास त्या मृत्यूस प्रायमा फेसी नैसर्गीक मानल्या जाऊ नये व हत्या व छळाचा परिणाम किंवा असा एखादा इव्हील एलिमेंट तर त्या मागे नाही ना याचा शोध घ्यायला लावतो. 
पण वरील कलम मात्र त्याही पुढे जाऊन अशी तरतूद सांगतो की विवाहीत स्त्रीला जर सासरच्यांनी काहिही त्रास दिला. तर विवाहितेनी नुसतं पोलिसांत तक्रार जरी दिली तरी अख्ख सासर उचलून पोलिस ठाण्यात डांबलं जातं. चौकशी वगैरे नंतर होते पण सगळ्यात आधी सासरच्यांना उचलून हवालात दाखविले जाते. 
परंतू मधल्या काळात या कलमाचा स्त्रीयांद्वारे खूप गैरवापर होवू लागला होता. त्यामुळे मग अशी तरतूद केल्या गेली की सासरच्यांना लगेच न उचलता एका समिती द्वारे प्रकरणाची छान बिन करुन मगच कारवाई केली जावी. परंतू ही मध्यस्थ समिती फारच करप्ट निघाली. नबरोबांकडून पैसे खाऊन छानबिन केल्यावर आपला अहवाल देताना विवाहितेवर अन्याय करु लागली. या विरोधात मग देशभरातील बायकांनी आवाज उठविला व अखेर हे मध्यस्त समितीचं लटांबर रिमुव्ह करण्यात आलं.
आता परत एकदा स्त्रीला या कलमाच्या अंतर्गत भक्कम सपोर्ट देण्यात आला आहे.