Sunday, 13 April 2025

अकृषक जमीन काय प्रकार असतो?

 

अकृषक जमीन काय प्रकार असतो?

मुळात सगळ्य़ा जमिनी या शेत जमिनी असतात. म्हणजेच कृषक असतात. या शेतजमिनीचे पण चार प्रकार असतात. ) बागायत शेतजमीन ) जिरायत शेतजमीन ) तरी शेतजमीन ) वरकस शेतजमीन. या सर्व प्रकारच्या शेतजमिनी या फक्त शेती या कामासाठी वापरायच्या असतात. इतर कामासाठी वापरण्यास बंदी आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे गाव, शहर व महनगरांच्या लगतच्या शेत जमिनी निवासी प्रयोजनार्थ अकृषक करुन वास्तव्यासाठी बांधकाम करता येते. आता अकृषक म्हणजे फक्त वास्तव्यासाठी रुपांतरीत करणे असे नाही. शेत जमिनीचे अकृषक रुपांतरण केले जाते तेंव्हा निवासी प्रयोजनार्थ याच्या व्यतिरिक्त आजून बरेच अकृषक प्रयोजनार्थ रुपांतरीत केले जाते. ते म्हणजेच गोडाऊन-अकृषक, शाळा-अकृषक, उद्योग-अकृषक, हॉस्पिटल-अकृषक, प्ले ग्राऊंड-अकृषक, हॉटेल-अकृषक, मंगल कार्यालय-अकृषक, क्रिडा संकुल-अकृषक, ट्रान्स्पोर्ट-अकृषक किंवा आजून कोणत्याही अशा कामासाठी जे काम कृषी म्ह्णजेच शेतीचे काम नाही अशा कामासाठी शेत जमीन रुपांतरीत केली जाते. त्यालाच संबंधीत अकृषक असे म्हटले जाते. लोकांना असे वाट्ते की अकृषक म्हणजे फक्त रहवासी असावे. पण तसे नसते. अकृषक म्हणजे बिनशेती. पण या बिनशेतीचे अनेक प्रकार असतात. तुम्ही ज्या प्रकारासाठी किंवा कामासाठी बिनशेती मध्ये रुपांतरीत करणार आहात तो तुमच्याशी संबंधीत एन.. म्हणजेच नॉन अग्रीकल्चरल असा प्रकार पडतो.

No comments:

Post a Comment