Sunday, 13 April 2025

फेरफार म्हणजे काय?

 

फेरफार म्हणजे काय?

जसं आपण सातबारा म्हणजे काय ते समजावून घेतलं तसच फेरफार सुध्दा समजून घेणे जरुरी असते. तारबा-यावर ज्या काही नोंदी येतात त्याचा आधार किंवा स्रोत जो असतो फेरफार असतो. फेरफार शिवाय सातबारा बनूच शकत नाही. म्हणजेच आपण जो सातबारा वाचत असतो त्यातील नामुना १२ च्या नोंदी या थेट घातल्या जातात पण नमुना च्या नोंदी या कायम फेरफार वरुन येतात. मग फेरफार म्हणजे काय? तर फेरफार वही ती वही असते ज्यात गावातील कोणत्याही जमिनीच्या स्वरुपात, मालही हक्कात, किंवा इतर हक्कात काही बदल करायचे झाल्यास हा बदल आधी फेरफार वहित नोंदविला जातो. समजा एकादा मिळकतीत त्या जमिनीच्या मालकाने कर्ज घेतले. तर ज्यांनी कर्ज घेतले त्याच्या /१२ च्या इतर हक्कात या कर्जाचा बोजा चढवायचा असतो पण तो थेट चढविला जाऊ शकत नाही. अमूक माणसाने तमूक बॅंकेतुन इतक्या रुपयाचे घेतली अशी तपशीलवार नोंद फेराफार वहित घातली जाते. ही नोंद घालताना नोंदीला अनुक्रमणीका पण दिला जातो. मग या नोंदीचा अंमल /१२ वर दिला जातो. हा अंमल देताना फेरफार वहितून कोणत्या नंबरच्या नोंदिवरुन सातबारावर बोजा चढविला हे लगेच कळावे म्हणून फेरफार वहितील संबंधीत अनुक्रमणीका नंबर कंसात लिहला जातो. त्यामुळे जेंव्हा तुम्ही /१२ वाचता तेंव्हा जे काही शेरा लिहलेला असतो त्याच्या बाजुला गोल करुन किंवा कंस करुन एक नंबर लिहलेला दिसेल. तो नंबर म्हणजेच फेरफार नंबर. म्हणजेच फेरफार वहितील तो अनुक्रमांक आहे त्यात संबंधीत व्यवहाराचा तपशील आहे. अशाच पद्धतीने जेंव्हा सातबाराच्या मालकी हक्कात वारसनोंद घातली जाते तेंव्हा सुध्दा अशीच प्रक्रीया असते. तुम्हाला /१२ वर फक्त एवढीच नोंद दिसते की जुनी वारस यांच्या नावापुढे कंस पडला, म्हणजे ती नावे कमी केलीत. आणि नविन नावे घतल्या गेलीत. पण बाकी तपशील मात्र इथे नसतो. तो काय आहे? अमूक माणूस वारस म्हणून कसा आला? कोणत्या दस्ताने आला? कधी आला ? हा सर्व तपशिल जिथे लिहलेला असतो ती वही म्हणजेच फेरफार वही. आणि फेरफार वहीने ज्या नोंदी घातल्या जाते त्याला सिरियल नंबर असतो. तुमची नोंद ज्या सिरियल नंबरला आहे तो नंबर म्हणजे फेरफार नंबर होय.

No comments:

Post a Comment