रेरा चे फ्लॅट
आपल्या कडे बिल्डर लोकं कोणताही नविन प्रकार बाजारात आणून लोकांची लूट करतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे फ्लॅटस. शहरी भागात जागा घेऊन घर बांधणे शक्य नसल्याने बिल्डर लोकं बहुमजली इमारत बांधुन त्यात फ्लॅट्स काढतात व विकतात. यात दोन प्रकारचे फ्लॅट्स दिसतात. एक म्हणजे रेरा मंजूर इमारती मधील फ्लॅट्स. तर दुसरा प्रकार म्हणजे गुंठेवारची फ्लॅटस. रेराचे फ्लॅट घेणे तसे तौलनिक दृष्ट्या सुरक्षीत व जरा भरवशाचा व्यवहार असतो. फ्लॅट खरेदी करताना दोन गोष्टी पाहणे. रेरा मध्ये फ्लॅट
घेत असाल तर वेबसाईत वरुन सर्व दस्त डाऊनलोड करुन तपासू शकता. वकिल नेमल्यास ते
अधिक उत्तम पध्दतीने कागदपत्र तपासून सांगू शकतात. पण यातही बेरचदा असे असते की
रेरा प्रोजेक्ट मध्ये बिल्डरच्या विरुध्द काही केसेस असतात. पण त्याची पुर्ण
माहिती वेबसाईटवर नसते. किंवा बिल्डर म्हणतो की आम्ही ते आलमोस्ट सेटल करत आलोय.
तुम्ही काळजी करु नका. पण नंतर पैसे घेऊन बिल्डर प्रोजेक्ट रखडवून ठेवतो. या सर्व
गोष्टी तुम्ही वकिल नेमून तपासू शकता. रेराचा प्रोजेक्ट असला तरी तुम्ही काही गोष्टी नक्की तपासा. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ७/१२ कोणाच्या नावे आहे. त्यात इतर हक्कात काही नोंदी आहेत का? कलम ८४-क आहे का? एखादे भुसंपादन, आरक्षण किंवा वारसांचा काही वाद आहे का? या सर्व गोष्टी सातबारा मध्ये पाहता येतात. त्या गोष्टी तपासून पाहणे. त्याच बरोबर झोन दाखला मागवून तो सुध्दा तपासून पाहणे. तसेच वारसांमध्ये काही वाद आहेत का ते तपासणे. त्याच बरोबर वाटपाचा दावा वगैरे चालू असल्यास जे दावेदार आहेत त्यांचा संबंधीत जमिनीत काय अधिकार आहे? किती हक्क आहे? हे सगळं तपासणे. त्याच बरोबर जरी रेरा प्रोजेक्ट असला तरी संबंधीत प्रोजेक्टर बिल्डरनी लोन घेतले का? त्याची परतफेड करतोय का? हे सर्व तपासावे.
एन.ओ.सी.
बिल्डरनी जर प्रोजेक्टवर लोन घेतले असेल तर तुम्ही फ्लॅट घेताना बिल्डरला असे सांगु शकता की ज्या बॅंकेचे लोन आहे त्या बॅंके कडून बिल्डरनी तुमच्या फ्लॅट साठी एन.ओ.सी. आणावी. म्हणजे उद्या जर बिल्डर पळुन गेला तर संबंधीत बॅंक प्रोजेक्ट ताब्यात घ्यायला येईल. तेंव्हा तुमचा फ्लॅट एन.ओ.सी. असल्यामुळे ताब्यात घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रोजेक्टवर बिल्डनी बॅंक लोन घेतले असल्यास फ्लॅट घेताना तुमच्या फ्लॅट पुरती एन.ओ.सी. घेऊनच पुढील व्यवहार करणे.
ताबा: रेरा प्रोजेक्ट मध्ये सगळ्य़ात मोठा घोळ
दिसतो तो म्हणजे ताब्याचा. बुकिंगच्या वेळी बिल्डर म्हणतो की अमूक तमूक वेळी ताबा
देईन. पण नंतर प्रोजेक्ट पुढे पुढे ढकलणे सुरु होते. अतोनात मनस्ताप होतो. हे होऊ
नये म्हणून रेराच्या वेबसाईटवर ताब्याची तारीख काय आहे ते बघणे. आणि तुम्ही करार
सही करताना ताब्याची तारीख न चुकता तपासणे. यात फरक असला कि मग घोळ होतो. बरीच लोकं बिल्डर सोबत करार सही करताना आपले नाव, वय, पत्ता व फ्लॅट नंबर नीट आले का पाहतात. बाकीच्या अटी व शर्थी पहात नाही. त्यामुळे भविष्यात अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. तुम्ही करारा मध्ये ताब्या बद्दल काय लिहले आहे हे न चुकता वाचावे. बरेच बिल्डर इथे खुप अफरातफरी करतात. पुर्ण पैसे मिळाल्या नंतर १२ महिन्यानी ताबा देऊ वगैरे अटी घालून अनेक प्रोजेक्ट अडकलेले आम्ही पाहिले आहेत. आता तर रेरा मध्ये ताब्याची तारीख आधीच सांगावी लागते. बिल्डर लोकं तसं रेराकडे जरूर देतात. पण नंतर प्रोजेक्ट एक्स्टेंड करुन घेतात. त्यामुळे ही तारीख सुध्दा बदलते. याचा फटका बसू नये म्हणून तुम्ही करार करताना ही तारीख नक्की तपासणे.
No comments:
Post a Comment