सामान्य माणूस पोलिसांना प्रचंड घाबरत असतो. त्याला असे
वाटते की आपल्यावरील अन्याय सांगायला गेल्यास पोलिसच आपल्यावर उलटतील. अन हे खरही
आहे. तुम्ही कोणतीही तक्रार दायला पोलिस स्टेशनला गेलात की पोलिस तुमच्यावरच
उलटतात. तासन तास बसवून ठेवतात. मग नंतर कधीतरी तक्रार लिहून घेतात पण ते ही मोठं
उपकार केल्यासारखं वागणं असतं. बरेचदा तर पोलिस तक्रार लिहुनही घेत नाही.
तुम्हालाच दटावतात व परत पाठवतात. बिचारा पिढीत कायद्याचं नॉलेज नसल्या कारणे गप
गुमान परत येतो व आपला राग गिळून जगायला लागतो. पण तेच जर याला कायद्याचं ज्ञान
असतं तर पोलिस हे करुच शकले नसते. मी तुम्हाला ते ज्ञान सांगतो.
कोणत्याही पोलिस स्टेशनला तकार द्यायला गेलात की एक हवालदार
व एक ड्युटी ऑफिसर असे दोन लोकं तुमच्याशी संवाद साधतात. यात हवालदार तुमची तक्रार
लिहून घेतो व ड्युटी ओफिसर सही करतो. हे असं का करतात? कारण असच करावं हे Mannual मध्ये लिहलेलं आहे. पोलिस
स्टेशनमध्ये प्रत्येक गोष्ट कशी करावी याचं मॅन्युअल असून ते फोलो करणं पोलिसांचं
काम आहे.
Sec-154 of Cr. P.C.
तुम्ही कोणतीही तक्रार द्यायला पोलिस स्टेशनला जाता तेंव्हा
घटनेचं स्वरुप ऐकून झाल्यावर हवालदार ठरवतो की मामला कॉग्निझीबल आहे की
नॉन-कॉग्निझीबल आहे. म्हणजे दखलपात्र आहे की अदखलपात्र. जर मामला दखलपात्र असल्यास
Sec. 154 of Cr.P.C. (Criminal Procedure Code) च्या अंतर्गत तक्रार दाखल करुन घेतल्या जाते. व नियमा प्रमाणे १०
मिनीटाच्या आत F.I.R. ची कॉपी तुम्हाला दिली जाते. कारण
मॅन्युअल नुसार पोलिसांना हे करणं बंधन कारक आहे.
Sec-155 of Cr. P.C.
सी.आर.पी.सी. चं वरील सेक्शन सुद्धा तक्रार नोंदवून
घेण्यासाठीच आहे. परंतू या सेक्शनच्या अंतर्गत अशा तक्रारी नोंदविल्या जातात ज्या
किरकोळ स्वरुपाच्या असून त्यातून समाजाला म्हणजेच स्टेट्ला कोणताच धोका नसतो. हे
असले मामले नुसतं दमदाटीनी किंवा संवादानी सोडविले जातात. यात पोलिस शक्य तो दोन पक्षात
सामंजस्याना मामला सोडविण्याचा पर्याय देतात.
Sec-154(3) of Cr. P.C.
एखादा पिडीत माणूस तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनात गेला
पण पोलिसांनी त्याची तक्रारच घेतली नाही किंवा त्याला पिटाळून लावलं असं बरेचदा
होत असतं. मग काय करावं हे मात्र लोकांना माहितच नसतं. जेंव्हा केंव्हा पोलिस
तुमची तक्रार घेत नाही किंवा पिटाळून लावतात तेंव्हा तुमच्या मदतीला येतो वरील सेक्शन...
म्हणजेच १५४(३). हा सेक्शन खास करुन पोलिसांच्या उदासीनवृत्तीवर मात करण्यासाठी व
फिर्यादी माणसाला न्याय देण्यासाठी आहे. जेंव्हा पोलिस तुम्हाला पिटाळून लावतात
तेंव्हा त्यांच्याशी वाद न घालता तुम्ही शांतपणे घरी या व एका कागदावर तुमची
तक्रार तपशीलासह नि मुद्देसूद लिहा. संबंधीत एस.पी. च्या नावे पोस्टाने तुमची
तक्रार पाठवून द्या. अशी तक्रार वरील सेक्शनच्या अंतर्गत थेट एस.पी. द्वारा
नोंदविली जाते. त्याची कॉपीही तुम्हाला दिली जाते. त्याच बरोबर संबंधीत पोलिस
स्टेशनला चौकशीचे आदेश जातात. एवढच नाही तर ज्यांनी तुमची तक्रार घेतली नाही
त्याच्यावर कारवाईसुध्दा होते. हे सगळं करण्याची तरतूद आहे वरील सेक्शन मध्ये.
तर मित्रांनो यापुढे जर पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही
तर घाबरु नका. १५४(३) च्या अंतर्गत थेट एस.पी. कडे तक्रार द्या. अन बिनधास्त रहा.
बघा कारवाई होते की नाही ते.
No comments:
Post a Comment