Wednesday, 18 November 2020

माफी मागून मोकळं व्हा.

Probation offenders act sec 4 & 12 च्या अंतर्गत 323 च्या केसेसचा गुन्हा कबुल करून मोकळं होता येतं. होतं काय की बरेचदा आपण चुकून किंवा संयम सुटला म्हणून मारापिटी करतो व आपल्यावर फौजदारी कारवाई होते. मग आपण घाबरून जातो ल नुसती पळपळ करतो. पण तसं करायची अजिबात गरज नसते. तुम्ही जर गुन्हेगारी वृत्तीचे नसाल व पहिल्यांदाच असं काही घडलं असेल तर मार्ग आहे तो म्हणजे प्रोबेशन ऑफेंडर्स एँक्ट.

सेक्शन 4: या सेक्शमध्ये गुन्हेगाराला त्याच्या चांगल्या वर्तनामुळे शिक्षा माफ करण्याची तरतूद आहे. चुकून भांडण झालं असल्यास जज समोर गुन्हा कबूल करून या सेक्शन अंतर्गत माफी मागावी. जज तुम्हाल प्रोबेशनवर सोडून देतील.

सेक्शन 12:- मध्ये काही संपत्ती वगैरे अटँच केली असल्यास ती मोकळी केली जाते.

थोडक्यात जर तुम्ही Frequent Offender नसाल व चिरकुट गुन्हा घडला असल्यास वरील कायद्यातील सेक्शन 4 व 12 तुमची मदत करतो. मा. जज समोर गुन्हा कबुल करायचा व माफी मागून मोकळं व्हायचं. बाकिची भानगड करत बसायचं नाही.

No comments:

Post a Comment