Sunday, 1 November 2020

पोलिसांची तक्रार कुठे करायची?



आपल्याला कोणाचा काही त्रास झाला की कुठे तक्रार करायची हे माहित असतं. जनरली पोलिसांकडे आपण तक्रार देतो. परंतू पोलिसांचा त्रास झाला तर मग कुठे तक्रार द्यायची हे कळत नाही. साधारणता आपण पोलिस स्टेशनला पोलिसाची तेही ऑनड्युडी पोलिसाची तक्रार घेऊन गेल्यास पोलिस तक्रार घेत नाही. वरून आपल्यालाच दोन सुनावून परत पाठवतात. मग यावर उपाय काय? कुठे तक्रार देता येते? कशी देता येते? आपण ते बघू या.

तर पोलिसाची तक्रार दाखल करण्याची एकुण प्रक्रिया अशी आहे.

Police Complaint Authority (PCA)
==========================

पोलिसांच्या विरोधातील तक्रार वरील अथोरिटि "PCA" कडे करता येते. जनरली हायकोर्टाचे निवृत्त जज किंवा IPS, IAS हे या बेंचचे हेड असतात. रिजनल लेवलवर या अथॉरिटिची नेमणूक केलेली असते. पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी ही अथॉरिटी बसते.

थेट PCA कडे तक्रार देता येते पण थेट यांच्याकडे तक्रार करून केस जिंकणे तेवढे सोपे नसते त्यासाठी खालील डावपेचानी तक्रार दाखल करावी. FIR न घेणे, पैसे मागणे, किंवा आजून कोणताही असा गुन्हा जो की त्यांनी ड्युडिवर असतांना केला असेल त्या संबंधीत पुरावा मात्र तुमच्याकडे असावा लागतो. अन्यथा केस टिकणार नाही. आजच्या काळात सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सुमडीत विडीओ रिकॉर्डिंग करून घ्यावी, बास.

तर समजा एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही तक्रार द्यायला गेलात व तिथला हवालदार किंवा PSI तुमची तक्रार घेत नसेल तर त्यांच्या विरोधात PCA कडे तक्रार देते येते. त्यासाठी पुराव्याची पण गरज नसते. कारण तुम्ही पोलिस स्टेशनला गेला होता याची सीसी टिवी  रेकॉर्डिंग असते म्हणून संबंधीत पोलिस तुम्ही आलाच नव्हता हे म्हणू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही PCA कडे जाऊ शकता पण त्या आधी...
1) संबंधीत SP/Commissioner ला पत्र लिहावं नि कळवावं की अमूक पोलिस अधिकारी कसा दोषी आहे वगैरे आणि ते पत्र पोस्टानी पाठवावं. त्या पत्राची कॉपी व पोस्टाची रिसीट जपून ठेवावी.
2) त्या नंतर त्या हद्दीतील मँजिस्ट्रेटकडे Cr.P.C. Sec 156(3) च्या अंतर्गत तक्रार दाखल करावी आणि SP ला पाठवलेल्या पत्राची कॉपी जोडावी.
3) एकदा मँजिस्ट्रेटकडे ही तक्रार दाखल झाली की लगेच याच तक्रारीची Certified Copy काढून घ्यावी. यावर कोर्टाचा शिक्का असतो. (ही आहे मेन ट्रीक)
4) ही सर्टीफाईड कॉपी Police Complaint Authority(PCA) कडे दाखल करायची, झालं तुमचं काम.

बास.... आता बघा गंमत.... त्या दोषी पोलिस अधिका-याला कोर्टही सम्मन्स बजावतो व PCA पण बजावतो. पीसीए तर निकाल लागे पर्यंत बढती थांबवून ठेवतो. त्या पोलिस अधिका-याला घरी येऊन तुमचे पाय धरल्या शिवाय दुसरा पर्याय नसतो. तुम्ही केस परत घेतली नाही तर त्याची नोकरीही जाऊ शकते.

इतकं सगळं जमत नसेल तर PCA कडे तक्रार देईन एवढं तर म्हणून बघा. पहा पोलिसांची प्रतिक्रीया काय येते.

No comments:

Post a Comment